Emergency Call :

020 40151540


News Details

डायबेटीस सपोर्ट ग्रुप : ११ डिसें. २०१५ ( मीटिंग ३ )
Friday December 11, 2015
डॉ. वैशाली देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या "डायबेटीस सपोर्ट" ग्रुपची तिसरी मिटिंग दि. ११ डिसें. १५ रोजी २ मजल्यावरील कॉन्फरन्स हॉलमध्ये झाली. यावेळी एकूण १२ रुग्ण उपस्थित होते. त्यामधील २ जण हे हॉस्पिटल बाहेरील पेशण्ट होते व "जागतिक मधुमेह" दिनानिमित्त जे चर्चासत्र झाले त्यापासून प्रेरित होऊन आले होते. 
 
"लिली" या औषध कंपनीच्या प्रतिनिधी सौ. शर्वरी यांनी "मधुमेह" या विषावर सत्र घेतले. त्यांनी एक मोठे पोस्टर सर्वांना दाखविले व पेशण्टकडूनच त्यांना ते पाहून काय समजले ते प्रत्येकाला वर्णन करावयास सांगितले. त्या प्रत्येकाचे वर्णन एकत्र करून "मधुमेह" म्हणजे आपल्या शरीरामध्ये नक्की काय उलथापालथ होते हे त्यांचाच शब्दात त्यांना सांगितले. त्यामुळे त्यांच्या मनातील बरेचसे गैरसमज दूर झाले अशी प्रतिक्रिया सर्वांनी दिली. 
 
बर्‍याच जणाना आहार या विषयी जास्त प्रश्न होते. आहाराचे काटेकोरपणे पालन करूनही वजन कमी होत नाही हि तक्रार जवळपास सगळ्यांची होती पण वेळेअभावी आणि आहाराविषयी पुढे सत्र होणार असल्याने मिटिंगचा समारोप करावा लागला.
 
 
पुढील मीटिंगची तारीख ८ जाने. आणि वेळ दु. १२.०० ते १.३० निश्चित करण्यात आली.
 
« Back